अबु धाबीचे क्राउन प्रिन्स भारतात




अबु धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायद अल नहयान यांचा भारतात भव्य स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. इंडिया विझिटवर आलेल्या राजकुमारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी पाहुणचार केला.


आपल्या भव्य स्वागताने भारतीयांचे मन जिंकलेले क्राउन प्रिन्स हे अगदी साधेपणाने आणि आपुलकीने आपल्या भोवतालच्या व्यक्तींशी संवाद साधताना दिसले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

  • न्यूक्लियर प्लांटवरील करार
  • एलएनजीवरील करार
  • स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप
  • डिफेन्स सहकार्य

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी अबु धाबी क्राउन प्रिन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि 5 करारांवर स्वाक्षरी केली. या करारापासून दोन्ही देशांना अनेक फायदे होण्याची अपेक्षा आहे.

अबु धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायद अल नहयान हे मंगळवारी भारत दौऱ्यावर होते. हा त्यांचा भारताचा पहिला अधिकृत दौरा होता.