आमची विस्मृतीची ही विधानसभा
भोपाळ गॅस आणि त्यानंतरची जीवघेणी रात्र विसरू शकणं अशक्य आहे. ३२ वर्ष झाले तरी त्या रात्रीचा भयानक आक्रोश मनात घुमतो, तो कानात येत राहतो.
या अघोरी घटनेला दोषी असणारी युनियन कार्बाईड कंपनी आणि तिचे मालक वॉरेन अँडर्सन आजही माझ्या मनात आहेत. त्यामुळे कधीही त्या कंपनीचे उत्पादन न वापरता त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याचा मी अभिमान बाळगतो
३२ वर्षांत युनियन कार्बाईड कंपनीने काय केले असेल का? किती दिवस वैतागून बसणार? कधी तरी उठाव करायला हवा! कंपनीने खूप मोठे नुकसान केले आहे. त्या नुकसानभरपाई बद्दल काहीच केले नाही. यावर कुणीही काही केले नाही. आम्ही हे विसरू की काय? हे इतक्या सहज विसरू शकतो का?
नाही, नाही सहन करणार आम्ही, मरण पत्करले तरी याविरोधात बोलत राहू.