नवरात्र दिवस ८




नवरात्री उत्सवाचाआठवा दिवस, म्हणजे दुर्गा अष्टमी, हा देवी दुर्गाच्या आठव्या स्वरूपांपैकी एक असलेल्या महागौरीला समर्पित असतो. अष्टमीला गुलाबी हा रंग संबंधित आहे. हा जिवंत रंग आशा, सौंदर्य आणि जागतिक प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो, जो महागौरीच्या सौम्य आणि करुण स्वरूपाचे प्रतिबिंब आहे.

महागौरी हिमालयात तपश्चर्येत तपस्या करत असताना, तिच्या शरीरावर बसलेली धूळ हिच्या शुद्ध तपश्चर्येने उतरून गेली आणि तिचे शरीर शुद्ध पांढरे झाले तेव्हापासून ती महागौरी या नावाने ओळखली जाते. महागौरी ही भगवान शंकराची पत्नी आहे. या महागौरीच्या नावाचाच अर्थ अत्यंत शुद्ध व पांढरट. या देवीची मूर्ती किंवा प्रतिमा दगडी असते. तिच्या मूर्तीवर लाल वस्त्र नेसविलेले असते आणि मस्तकावर चंद्रकोर असतो. देवीच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू आणि अभयमुद्रा अशी तीन आयुधे असतात.

महागौरीच्या पूजेसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे. व्रताच्या 8 व्या दिवशी, मंदिरात जाऊन दही, दुधाचा नैवेद्य दिला जातो. नवरात्रीमध्ये अष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी मातृकेची पूजा मोठ्या भक्तिपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केल्यास विशेष फळ मिळते असे मानले जाते.

या दिवशी रात्री कालरात्रीची पूजा करणे, मंत्रांचा जप करणे अत्यंत लाभदायक असते. विशेषतः दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो. त्यामुळे घरावर येणारी संकटे दूर होतात. नकारात्मक शक्तीवर विजय मिळतो. दैवी शक्तीची प्रप्ती होते. नवरात्रीच्या काळातील आठव्या दिवसाचे व्रत वैभवशाली असे असते.

आणि हो, महाअष्टमीच्या दिवशी कन्यांचे पूजन केले जाते. नेहमी असे म्हटले जाते की, नवरात्रीमध्ये नवदुर्गांचे नऊ रूपांची पूजा केली जाते. मात्र दुर्गा अष्टमीच्या दिवशी,म्हणजे नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीचे पूजन केले जाते. या दिवशी कन्यांचे पूजन करण्याचीही परंपरा आहे.