भारतीय नौदल दिवस




आपल्या देशाच्या संरक्षणात नौदल हा कणा आहे. हे संरक्षण करणारी ढाल आहे. देशाच्या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवून आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे काम भारतीय नौदल करत असते.
नौदल दिवस हा त्याच भारतीय नौदलाच्या शौर्याला, पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. भारतीय नौदलाच्या स्थापनेच्या दिवसाचे स्मरण म्हणजेच नौदल दिन आहे. १९३४ साली मुंबईत रॉयल इंडियन्स नेवी या नावाने या नौदलची स्थापना करण्यात आली होती. त्या पाठोपाठ दुसरे महायुद्धातही भारताने सहभाग घेतला. युद्धात नौदलाने केलेल्या कामगिरीबद्दल इंग्रजांनी भारतीय नौदलाला त्यांच्या बरोबर लढण्यासाठी बोलावले होते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी १९४२ साली नौदलची जपानमध्ये स्थापना केली होती.
त्यानंतर १९७१ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धात नौदलाने शौर्याची झलक दाखवली. कराची बंदरावर हल्ला करून नौदलाने पाकिस्तानच्या अनेक युद्धनौका नष्ट केल्या. या युद्धाच्या पाच दिवसांनी म्हणजेच ४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय विजय झाला. भारतीय नौदलदलाचा हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.