25 डिसेंबर




या महिनाभरात सर्वात फेस्टिव दिवस म्हणून ओळखला जातो. 25 डिसेंबर हा ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांसाठी उत्साह आणि आनंदाचा दिवस. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस ख्रिश्चन जगातील खास सण मानला जातो.
आपण आता 21 व्या शतकात आहोत, तरी सुद्धा अजूनही जगात अनेक ठिकाणी 25 डिसेंबर हा दिवस विशेष उत्साहात साजरा केल्याचं पाहायला मिळते. जगभरातील ख्रिश्चन धर्माचे अनुयायी मंडळी, चर्च मध्ये एकत्र जमून, केक कापून हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करतात.
25 डिसेंबर हा दिवस जगभरातील बहुतांश देशात सुटीचा दिवस असतो. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये हा दिवस बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. इंग्लंड मध्ये तर या दिवशी बँक बंद असतात.
या दिवशी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी मंडळी एकत्रित होऊन चर्च मध्ये केक कापतात आणि गाणी म्हणतात. जगभरातील सर्व देशात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस आता ख्रिश्चन आणि अख्रिश्चन असा भेद न करता सगळेच लोक उत्साहात साजरा करत आहेत.
आता लोकांच्या जीवनशैली बदलत आहे. भारतीय देखील आता अनेक गोष्टी नव्या पद्धतीने साजरी करत आहेत. पूर्वी भारतात फक्त ख्रिश्चन लोकच हा दिवस साजरा करत असत, पण आता अनेक हिंदू, मुस्लिम, जैन, शीख तरुण पण हा दिवस उत्साहात साजरा करतात.

Christmas उत्सव जगभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. 25 डिसेंबर ला एकत्रित कुटुंब थंडीत एकत्रित जेवण करतात, गाणी म्हणतात, खेळ खेळतात, उपहार देऊन घेतात.