Farmers' Day




शेतकरी दिवस
प्रत्येक देशामध्ये, शेतकरी आणि त्यांच्या शेतीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी, एक खास दिवस असतो. तोच हा दिवस म्हणजे "शेतकरी दिवस".
महाराष्ट्राच्या शेतीविषयक विस्तारकार्यक्रमांचे जनक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले ,असे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रात २६ जुलै रोजी शेतकरी दिन साजरा केला जातो.
शेतकरी हे केवळ धान्य उत्पादक नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. त्यांच्या कष्टामुळेच आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळतो. शेतातच राष्ट्राचे कल्याण आणि बळ दडलेले आहे. "अन्नदाता" म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हा समाजाला अन्न पुरवण्याचे महत्वाचे काम करतो.
समाजाच्या विकासात शेतकऱ्याचे योगदान सर्वात जास्त आहे. ते आपले संपूर्ण आयुष्य शेतात घालवतात. दिवसा उन्हातान्हात आणि रात्री थंडीत त्यांना शेतात राहावे लागते. आपले पोट भरण्यासाठी ते दिवसभर कष्ट करतात. पण त्यांचे कष्ट आणि त्यांच्या शेताच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांना योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन त्यांना हवे तसे विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या उचलत्या बाजूने काही पावले उचलणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीमधून योग्य उत्पन्न मिळेल. शेतकरी हा देशाच्या रीढाचा कणा आहे. म्हणून, शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहाय्य करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे, यासाठी शासनाने भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्यांना वेळेवर वीजपुरवठा, पाणी पुरवठा, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे काम सरकारने केलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये मदत करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी आपण शेतकऱ्यांकडून किंवा गावाकडून भाजीपाला, फळे खरेदी करू शकतो. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उद्योगासाठी सहाय्य करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि शेती हा व्यवसाय सर्वांसाठी आकर्षक ठरेल.
धन्यवाद !