क्रिकेटमध्ये T20 म्हणजेच ट्वेंटी ट्वेंटी हा सर्वात लोकप्रिय फॉरमॅट असल्याचं ओघानेच. कारण त्यामध्ये चार तासांचा सामना केवळ 3 तासात संपतो, शिवाय एकूण सामन्यात फक्त 40 षटके असतात. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला बॅट आणि बॉल दोन्हींमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की आतापर्यंतच्या इतिहासात T20 मध्ये सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या आहेत? चला याच विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.
T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वे या संघाच्या नावावर आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी ICC मेन्स T20 वर्ल्डकप आफ्रिका सब रिजन क्वालिफायरमध्ये झिम्बाब्वे संघाने गँबिया संघाविरुद्ध अवघ्या 20 षटकांत 344 धावा कवल्या आहेत.
या सामन्यामध्ये सिकंदर रझाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात अवघ्या 43 चेंडूत 133* धावांची धडाकेबाज खेळी खेळली. मॅथ्यु चिमांभा या खेळाडूने देखील याच सामन्यात 59 चेंडूत 102 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.
या सामन्यामुळे आता झिम्बाब्वे संघाचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वे संघाच्या नावावर आहे.
T20 क्रिकेटमध्ये अशी अनेक खेळी पाहायला मिळाली आहे जी कधीही विसरता येणार नाही. अशी अनेक नावे आहेत जी T20 क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहेत. त्यामुळेच क्रिकेट हा खेळ जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट हा खेळ प्रत्येक देशातील लोकांना एकत्र आणतो आणि त्यांना एकत्रितपणे आनंद घेण्याची संधी देतो.